
बारामती : शहरातील नगरपरिषद हद्दीत या पुढील काळात रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी कारवाई करण्याचा मोठा निर्णय बारामती नगरपरिषदेने घेतला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.