बारामती नगरपालिकेकडून कोरोनाबाबत उपाययोजनांना प्रारंभ

Baramati Municipal initiates measures for corona
Baramati Municipal initiates measures for corona

बारामती : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आज पन्नाशीच्या पुढे गेल्यानंत बारामती नगरपालिकेने विविध उपाययोजना अंमलात आणण्यास प्रारंभ केल्या आहे.  कोरोनाबाधीत रूग्णांचा शोध घेणे, रूग्णांना रूग्णालयीन व्यवस्थेबाबत माहिती देणे, रूग्णांचा कोरोना आजाराबाबत पाठपुरावा घेणे ही कामे नियंत्रण कक्षातून सुरु झाली आहेत. 

मुख्याधिकारी किरणराज यादव म्हणाले, शहरातील एकूण 46 शाळा , कॉलेज , खासगी शिकवणी वर्ग, लायब्ररी , ग्रंथालय यांना 14 मार्च पर्यत बंद ठेवण्यात येणार असून मंगल कार्यालय, सभागृहांना प्रत्यक्ष भेटी देत 200 हून कमी लोक असतील याची खातरजमा होईल, एसीचा वापर टाळणे, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनिंग, नावांचा तपशिल, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर या वर लक्ष ठेवले जाईल. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे घरोघर जाऊन ऑक्सिमीटर , थर्मल स्कॅनिंग मशीनव्दारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे काम पुन्हा चालू केले आहे. अतिजोखमीच्या सहवासी यांचे लक्षणानुसार तात्काळ टेस्टिंग अथवा नमुना तपासणी करून अहवाल येईपर्यत संस्थात्मक विलगीकरण करणे किंवा कोवीड केअर सेंटर येथे दाखल होणेबाबत सूचना देखील करण्यात येत आहेत.

 नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामधील नर्सेसमार्फत दररोज कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच कोरोना रूग्णांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती अद्ययावत केली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षेसाठी पेालीस  , परिवहन विभाग व नगरपरिषदेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्या , सोशल डिस्टंटिगचे पालन न करणाऱ्या त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांना दंडात्मक  कारवाईची मोहिम  तीव्र झाली आहे. कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्था, लग्नकार्यालये यावरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com