Video : बारामती कोणत्या पवारांसोबत? ऐका लोक काय म्हणताहेत...

मिलिंद संगई
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

'आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत!, समस्त बारामतीकर, असे फ्लेक्स बारामतीमध्ये लागले आहेत. संबंधित फ्लेक्सची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.

पुणे: 'आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत!, समस्त बारामतीकर, असे फ्लेक्स बारामतीमध्ये लागले आहेत. संबंधित फ्लेक्सची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवारांच्या निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणांच्या विरोधात आहेत. राष्ट्रवादीचा एकही नेता त्यांच्यासोबत राहणार नाही. जे सदस्य गेले त्यांना पूर्वीपासून माहिती होती. जे जाणार असतील त्यांनी लक्षात ठेवावे पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व जाऊ शकते. महाराष्ट्राचा जनमानस भाजपविरोधात आहे. त्यामुळे जनमताविरोधात जाऊन निर्णय घेणार असेल तर त्यांचा मतदारसंघातील मतदार त्यांच्यासोबत राहणार नाही. पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र मिळून त्या उमेदवाराचा पराभव केला जाईल. आमचे 10 ते 11 सदस्य त्यात सहभागी झाले होते. त्यातील सहा सदस्यांची माहिती मिळाली आहे. त्यानंतर एक-एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरवात केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर बारामतीमध्ये अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अजित पवारांनी गद्दारी केली, अजित पवारांवर कारवाई केली जावी, उदयनराजेंचे जे हाल झालेत तसेच अजितदादांचे होणार, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. दरम्यान, अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati people says we are with ncp leader sharad pawar flex viral