
बारामतीच्या छायाचित्रकाराला जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांक
बारामती - तालुक्यातील पणदरे येथील हौशी छायाचित्रकार प्रवीण जनार्दन जगताप यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. बारामती पंचक्रोशीत आढळणाऱ्या दुर्मिळ लांडग्याचा (Indian gray wolf) त्याच्या पिल्लासह टिपलेल्या छायाचित्रास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जगातील फोटोग्राफीमधील ही सर्वात मोठी स्पर्धा असते.
बारामती, दौड, सासवड, फलटण, सातारा, कर्जत, अहमदनगर, सोलापुर या माळरानावर हा लांडगा आढळतो. पूर्वी लांडगा फक्त शिकार करत परंतु अलिकडच्या काळात पोल्ट्री मधील टाकून दिलेल्या कोंबड्यावर त्यांची गुजराण होत आहे. प्रवीण जगताप यांनी काही वर्षांपूर्वी फोटोग्राफी सुरु केली. वन्यजीव फोटोग्राफीसाठी त्यांनी ताडोबा, नागझिरा, पेंच, कान्हा, बांधवगड यासह हिमायलायातील किब्बर, सत्ताल अशा अनेक ठिकाणी अनेक वर्षे भटकंती केली. या दरम्यान त्यांनी लांडगे, कोल्हे, तरस अशा प्राण्यांचे फोटो काढले.
या छायाचित्रापैकी लांडग्याच्या फोटोला जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. 174 देशातील सव्वा लाख छायाचित्रकारांनी यात भाग घेतला. यात 4 लाख 70 हजार फोटो आले होते. वाईल्ड फोटोग्राफीमध्ये बेस्ट फोटो आणि टॅाप फोटोग्राफर म्हणुन या दोन्ही मध्ये दुसरा क्रमांक आला.
लवकरच फिल्म....
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने सुनेत्रा पवार यांनी याची दखल घेत याच विषयावर किंग ऑफ ग्रासलँड ही एक शॉर्ट फिल्म तयार करण्याचे काम सुरु केले आहे. प्रवीण जगताप यांच्यावरच या उपक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.