Traffic Police Attack : बारामतीत वाहतूक पोलिसाला थार वाहनाने फरफटत नेले; सम्यक चौकातील घटनेत पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले जखमी

Police Constable Dragged by Mahindra Thar in Baramati : बारामतीतील सम्यक चौकात वाहतूक नियमन करताना पोलीस कर्मचाऱ्याला थार वाहनाने धडक देत बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना घडली. या प्रकारात कर्मचारी जखमी झाला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Police Constable Dragged by Mahindra Thar in Baramati

Police Constable Dragged by Mahindra Thar in Baramati

sakal
Updated on: 

बारामती : वाहतूक नियमनाचे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर महिंद्रा थार वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास सम्यक चौकात घडली.

या घटनेत पोलीस अंमलदार दत्तात्रय यशवंत भोसले जखमी झाले असून, त्यांना वाहनाच्या बोनेटवरून तब्बल ४० ते ५० फूट अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले.

Loading content, please wait...