
बारामतीच्या सदनिकेत एक शिक्षक दांपत्य भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे.सदरच्या सदनिकेचे हे शिक्षक दांपत्य भाडे देत नव्हते किंवा विकत घ्या म्हटलं तर त्यालाही त्यांची तयारी नव्हती. संजय प्रभुणे यांना या सदनिकेचा ताबा देण्यास त्यांची तयारीच नव्हती.
वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात भाडेकरूने मांडले ठाण; पोलिस मदतीला येताच...
बारामती : प्रशासनाने, विशेषतः पोलिस विभागाने जर मनावर घेतले तर असाध्य ते साध्य होऊ शकते याचा प्रत्यय बारामतीतील एका ज्येष्ठ दांपत्यास नुकताच आला.
भाडे न देणाऱ्या भाडेकरुंकडून सदनिकेचा ताबा सोडण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे या दाम्पत्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भाडेकरुंकडून सदिनेकेचा ताबा मिळविण्यासाठी सगळे प्रयत्न करुनही यश मिळाले नाही. अखेर या दांपत्याने पोलिसाकडे धाव घेतली आणि त्यांचा प्रश्न सुटला.
झाले असे की, बारामतती शहरातील अशोकनगर येथे म.ए.सो. विद्यालयाचे दिवंगत मुख्याध्यापक श्रीकांत प्रभुणे यांची सदनिका आहे. प्रभुणे यांच्या निधनानंतर ही सदनिका त्यांचे बंधू संजय गजानन प्रभुणे यांच्या नावावर झाली. संजय हे सासवड येथे वास्तव्यास असतात.
बारामतीच्या सदनिकेत एक शिक्षक दांपत्य भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे.सदरच्या सदनिकेचे हे शिक्षक दांपत्य भाडे देत नव्हते किंवा विकत घ्या म्हटलं तर त्यालाही त्यांची तयारी नव्हती. संजय प्रभुणे यांना या सदनिकेचा ताबा देण्यास त्यांची तयारीच नव्हती. प्रभुणे यांनी अनेक महिने विविध मान्यवरांकडून सदनिकेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही.
शेवटी नाईलाजाने प्रभुणे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात परिविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर भुजबळ, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी सगळ्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर संबंधित शिक्षक दांपत्यास बोलावून घेण्यात आले. शिक्षक दांपत्याने युक्तीवादाचा प्रयत्न करीत पोलिसांना ही दिवाणी बाब असल्याची जाणीव करुन दिली. पोलिस निरिक्षकांनी त्यांना असलेल्या अधिकारांची जाणीव खास शैलीत करुन दिल्यानंतर मात्र नरमलेल्या या दांपत्याने सदरची सदनिका चार महिन्यात मोकळी करुन देण्याचे लेखी आश्वासन दिले.
दमदाटी चालणार नाही...
मालकी नसताना सदनिका बळकावण्याचा प्रयत्न संबंधित लोक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही कारवाई करण्याची तयारी केली होती, मात्र संबंधितांना लेखी आश्वासन दिल्यामुळे कारवाई केलेली नाही
- नामदेव शिंदे, पोलिस निरिक्षक बारामती.
Web Title: Baramati Police Help Elderly Couple Removing Tenants Their House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..