बारामतीत पोलिसांनी पुढाऱ्याला आणले गुडघ्यावर...

मिलिंद संगई
Friday, 18 December 2020

शहरातील एका पुढा-याला शहर पोलिसांनी आज चांगलाच वठणीवर आणला. एका गरीब शेतक-याकडून सावकारीसाठी लिहून घेतलेली जवळपास तीन कोटी रुपयांची जमीन आज पोलिसांच्या हिसक्याने त्या गरीब शेतक-याला पुन्हा मिळाली.

बारामती : शहरातील एका पुढाऱ्याला शहर पोलिसांनी आज चांगलाच वठणीवर आणला. एका गरीब शेतकऱ्याकडून सावकारीसाठी लिहून घेतलेली जवळपास तीन कोटी रुपयांची जमीन आज पोलिसांच्या हिसक्याने त्या गरीब शेतकऱ्याला पुन्हा मिळाली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द उघडलेल्या मोहिमेला आता चांगले यश येत असून, सावकारांचे धाबे दणाणले आहे. 

भावकीतील लग्नाला जाणे पडले ३.७५ लाखाला

बारामतीतील जळोची परिसरातील एका प्रतिष्ठीत पुढाऱ्याचा हा किस्सा. 2017 मध्ये येथील नागवडेवस्तीवरील एका शेतक-याला त्याने दहा लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले. संबंधित शेतक-याने महिना लाख रुपये या प्रमाणे अठरा महिने पैसे देऊनही हा पुढारी त्याच्याकडे अजून पाच लाखांची मागणी करत होता. इतके करुन तो थांबला नाही तर बारामती बाजार समितीतील गाळा आपल्या नावाने लिहून दे  म्हणून तो मागे लागला होता. सततच्या धमक्यांनी संबंधित शेतकरी घाबरला होता. पैसे दिले नाही तर तुझ्या जमिनीवर राजकीय वजन वापरुन आरक्षण टाकायला लावीन अशीही धमकी त्याने दिली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द उघडलेल्या मोहिमेच्या बातम्या वाचून संबंधित शेतक-याने त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. शिंदे यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सावकाराला पोलिसांचा सांगावा गेला...पोलिस ठाण्यात आल्यानंतर आपण किती मोठे राजकीय नेते आहोत, आपल्या किती ओळखी आहेत याचा पाढा वाचून झाल्यावरही नामदेव शिंदे त्याला भीक घालत नाही उलट कारवाईची तयारी सुरु झाल्याने अखेर नरमलेल्या या पुढा-याने संबंधित जमीन त्या शेतक-याला उलटून देण्याची तयारी दाखवली व जमीन उलटून पुन्हा त्याच्या नावे करुन दिली. 

कोरोना नंतर शिवाजीनगर परिसरात आॉनलाईन साठी गर्दी वाढत आहे

आजच्या बाजारभावाप्रमाणे या दीड एकरांची किंमत तीन कोटींच्या घरात आहे. त्या मुळे या शेतक-याने पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान कोणीही सावकार त्रास, धमक्या देत असल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati police took action against the leader