

बारामती - येथील ज्येष्ठ विधीज्ञ अँड. एस.एन. जगताप यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी अँड. जगताप यांना नियुक्तीचे पत्र सादर केले.
बारामती तालुक्यात शरद पवार गटाच्या कार्यकारिणीच्या निवडीचे सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वातावरण आता वेगळ्या दिशेने जाणार ही बाब स्पष्ट झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या भूमिकेला विरोध केला होता. त्या नंतर आता बारामतीत शरद पवार यांच्या वतीने पक्षीय बांधणी सुरु करण्यात आली आहे.
अँड. एस.एन. जगताप हे बारामती तालुक्यात ज्येष्ठ विधीज्ञ व पवार कुटुंबियांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. बारामतीत आता राष्ट्रवादीचे दोन गट कार्यरत राहणार हे आज स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर बारामतीत त्याचे व्यापक स्वागत झाले होते. अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कारही झाला होता. त्या नंतर अनेक राजकीय चर्चा झाल्या, मात्र आता शरद पवार गटाच्या वतीने पक्षीय बांधणी सुरु झाल्यामुळे बारामतीतही राजकीय समीकरणे वेगळी होणार हे स्पष्ट झाले आहे.
खरच दोन गट पडलेले आहेत का या बाबतही चर्चा अनेक स्तरावर सुरु होत्या. आजच्या अँड. एस.एन. जगताप यांच्या नियुक्तीने बारामतीत राष्ट्रवादी मध्ये दोन गट झाल्याचे उघड झाले आहे. आगामी सर्वच निवडणूकात हे दोन गट परस्परांसमोर उभे ठाकणार की आणखी काही समीकरणे बदलणार या बाबतही चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.