बारामती तालुक्यात वीजचोरीचे तीन ठिकाणी प्रकार उघडकीस

बारामती तालुक्यात वीजचोरीचे 
तीन ठिकाणी प्रकार उघडकीस
Published on: 

बारामती, ता. १७ : बारामती तालुक्यातील झारगडवाडी, काटेवाडी आणि सोनगाव येथे वीजचोरीचे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. वीजमीटर बायपास करणे, तसेच वीजवाहिनीवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
‘महावितरण’च्या पथकाने केलेल्या तपासणीत झारगडवाडी येथे सीताराम बाबा घोरात यांच्या घरातील मीटर बायपास करून वीज वापरल्याचे आढळले. या प्रकारात २ हजार ३११ युनिट विजेची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना ५० हजार ९६० रुपये वीजचोरीचे बिल आणि ४ हजार रुपये तडजोड बिल आकारण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत काटेवाडी येथे दीपक विठ्ठल काटे यांनी वीजवाहिनीवर सुमारे २५ फूट अंतरावर आकडा टाकून घरगुती वापरासाठी वीज घेतल्याचे तपासणीत आढळले. या प्रकारात ४५० युनिट विजेची चोरी झाल्याचा अंदाज असून, ७ हजार ४२० रुपये वीजचोरीचे बिल आणि २ हजार रुपये तडजोड बिल आकारण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत सोनगाव येथे जागामालक महिला व दुकानमालक बापू लक्ष्मण माने यांच्या ठिकाणी मीटर बायपास करून वीज वापरल्याचे आढळले. या प्रकरणात ४३७ युनिट विजेची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून, १० हजार २८० रुपये वीजचोरीचे बिल आणि २ हजार रुपये तडजोड बिल आकारण्यात आले आहे.
या तिन्ही प्रकरणांत भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर संबंधितांनी वीजचोरीची बिले भरली नसल्याने गुन्हे दाखल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.