बारामती-पुणे मार्गावर अपुऱ्या बससेवेमुळे हाल

बारामती-पुणे मार्गावर अपुऱ्या बससेवेमुळे हाल
Published on

बारामती, ता. १० : प्रवाशांची वाढती गर्दी आणि अपुरी बससेवा यामुळे बारामती-पुणे-बारामती प्रवास सध्या प्रवाशांसाठी अक्षरशः दिव्य बनला आहे. सकाळी आणि सायंकाळी बससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत.
बारामती बस स्थानक प्रशस्त असले तरी स्वारगेट बसस्थानकावर उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने महिला व ज्येष्ठांचे हाल होत आहेत. बारामती आगाराचे व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी सांगितले की, या मार्गावर विनावाहक व विनाथांबा श्रेणीतील दररोज १०० फेऱ्या होतात. यात सात शिवाई बसच्या २८ आणि १८ लालपरी बसच्या ७२ फेऱ्यांचा समावेश आहे. सुट्यांच्या काळात अतिरिक्त १२ फेऱ्या वाढविल्या जातात. मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा ताण असल्याने फेऱ्या वाढविण्यात मर्यादा येत असल्याचे डुबल यांनी स्पष्ट केले.

वीस नवीन गाड्यांची गरज
बारामती आगाराकडे सध्या ६७ सीएनजी बस, १० लालपरी आणि २२ एशियाड अशा एकूण ९९ बस आहेत. आगाराला किमान २० नवीन बसची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविला आहे. बीड आगाराकडून आलेल्या १० जुन्या बस वारंवार बंद पडत असल्याने तक्रारी वाढत आहेत.

मार्ग बदलण्याची प्रवाशांची मागणी
दिवे घाट ते हडपसर दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने वेळ वाया जात आहे. त्यामुळे लोणीपाटीमार्गे सुपे-चौफुला आणि तेथून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने हडपसर-स्वारगेट असा पर्यायी मार्ग करावा, अशी मागणी प्रवासी सुनील सुतार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com