esakal | बारामती : कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

baramati news

कोरोनाला गांभीर्याने घ्या असं वारंवार सांगूनही अनेक जण अजूनही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

बारामती : कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाला गांभीर्याने घ्या असं वारंवार सांगूनही अनेक जण अजूनही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. दरम्यान, बारामतीत गेल्या चार दिवसांत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या तब्बल २३ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. 

गेल्या वर्षी ७ जुलै २०२० पासून कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांवर अग्नी देण्याबरोबरच दफनविधीचेही काम नगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत. दिवस नाही की रात्र नाही, चोवीस तास कधीही निरोप आला की मृतदेह स्माशनभूमीत आणून त्या मृत व्यक्तीवर घरातली व्यक्तीप्रमाणं त्याच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होतील याची काळजी हे सर्वजण घेत आहेत. कितीही काम पडलं तरी तितक्याच सन्मानपूर्वक प्रत्येकाला निरोप देण्याचं वेगळं काम या टीमकडून होतं आहे. 

व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेमुळे स्थिती गंभीर

एकीकडे समूह संसर्ग झाल्याने वेगाने कोरोना रुग्णांची संख्या बारामतीत वाढत असताना दुसरीकडे व्हेंटिलेटर्सची उपलब्धता नसल्याने प्रश्न गंभीर बनला आहे. बारामतीतील एका पन्नास वर्षीय व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांनी धावाधाव करुन व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिला पण तोपर्यंत उशीर झालेला होता. 

विशेष समिती सोडणार रेमडेसेविरच्या तुडवड्याची समस्या; रुग्णांचे हाल थांबणार! 

दरम्यान, बारामती नगरपालिकेच्या टीमने काल एकाच दिवसात सात जणांवर आणि आज पाच जणांवर अंत्यसंस्कार केले. ७ जुलै २०२० पासून आजपर्यंत बारामती शहर व तालुक्यातील २५७ तर बाहेरील १५३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली. 

यांच्या खांद्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारी

बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शितोळे, मजिद पठाण, राजेश लोहाट, सलीम शेख, पंकज पवार, साजन खोमणे, विनोद क्षीरसागर, अजय खरात, राजू पवार, युवराज खिराडे, चेतन चव्हाण, नितीन शिंदे हे मानवतेच्या दृष्टीनं सेवाभावी काम करत आहेत. आजवर त्यांनी जाती-धर्माच्यापलिकडे जाऊन ४१० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.