बारामतीतील व्यापारी आक्रमक

कोरोनाचा दर तीन टक्क्यांपर्यंत खाली
baramati
baramatisakal
Updated on

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोना (corona) पॉझिटिव्हिटीचा दर तीन टक्क्यांपर्यंत खाली आल्याने आता बारामतीचे (Baramati) निर्बंध उठवावेत, अशी मागणी व्यापारी करू लागले आहेत. बारामतीत (baramati) १ ते ३० जुलै या तीस दिवसांत तब्बल ३५०३५ नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी झाली. या पैकी १३६६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. याची पॉझिटीव्हीटी अवघी तीन टक्के इतकी आहे. पूर्वी बारामतीत जो कम्युनिटी स्प्रेड झाला होता आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी होती, त्या पार्श्वभूमीवर आता बारामतीतील रुग्णांची संख्या नगण्य आहे. (baramati restrictions get up businessman aggressive)

एकीकडे रुग्णसंख्या घटत असून, दुसरीकडे प्रशासनाने तपासण्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढवली असल्याने बारामतीने कोरोनावर मात केली असल्याचेच चित्र आहे. तीस दिवसांची आकडेवारी पॉझिटीव्हीटी तीन टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे दर्शवीत आहे. त्यामुळे आता जनजीवन पूर्ववत करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. बारामतीत सरासरी दररोज ११०० तपासण्या होत आहेत. जुलै महिन्यात तीन दिवस दोन हजारांहून अधिक तपासण्या करण्याचा विक्रमही प्रशासनाने केला आहे.

baramati
पुणे : सहकारी संस्थांच्या ऑनलाइनद्वारेच सभा

व्यापाऱ्यांचे म्हणणे...

बारामतीत शनिवार, रविवार वीकेंड लॉकडाउन असून, दररोज दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हॉटेल, मॉल, थिएटर बंद असून हॉटेलच्या पार्सल सेवेसच परवानगी आहे. अनेक व्यवसाय व व्यक्तींवर याचा आर्थिक परिणाम जाणवत असून, आता आर्थिक घडी बसविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच परवानगी द्यावी, अशी मागणी आहे. हॉटेल ३ एप्रिलपासून बंद असल्याने त्यांचे कमालीचे नुकसान झाले आहे. दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत केली, तर गर्दीही आपोआपच कमी होईल व लोक सोयीनुसार येऊन खरेदी करून जातील. वीकेंड लॉकडाउन उठवला तर सुटीच्या दिवशीही लोक खरेदीला येऊ शकतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

baramati
पुणे : कोरोना रुग्णांसाठी ८१ हजार खाटा

लॉकडाउन, वीकेंड लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे कमालीचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी प्रत्येक अडचणीच्या काळात प्रशासनास सहकार्य केले आहे. आता वीकेंड लॉकडाउन उठवावा, दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत करावी. श्रावण महिन्यापासून सीझन सुरू होतो. पुढील चार महिने दुकाने व्यवस्थित सुरू राहिली, तर दिवाळीपर्यंत पूर्वीचा बॅकलॉग भरून निघेल.

- नरेंद्र गुजराथी व नरेंद्र मोता, बारामती व्यापारी महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com