Baramati News : बारामती शून्याच्या घोळाने शासकीय महसूलाचे नुकसान...

शहरातील मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने रेडी रेकनर दरातील सूचीमध्ये शून्याचा घोळ झाल्याने जमिनीच्या मूल्यांकनामध्ये देखील तफावत झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. शून्याच्या घोळाने शासनाच्या महसूलाचे नुकसान झाले आहे.
Baramati shocking discrepancy valuation of land due to zero in ready reckoner rates
Baramati shocking discrepancy valuation of land due to zero in ready reckoner ratesSakal

बारामती : शहरातील मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने रेडी रेकनर दरातील सूचीमध्ये शून्याचा घोळ झाल्याने जमिनीच्या मूल्यांकनामध्ये देखील तफावत झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. शून्याच्या घोळाने शासनाच्या महसूलाचे नुकसान झाले आहे.

शहरातील पत्रकार जितेंद्र जाधव यांनी त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रीया सुरु केल्यानंतर ही बाब समोर आली. बारामती शहरातील हद्दवाढ झालेल्या वाढीव क्षेत्रामध्ये 2022 - 23 आणि 2023- 24 या वर्षाकरिता जैसे थे,

रेडी रेकनर चे दर ठेवण्यात आले आहेत. बारामतीच्या जळोची क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक 232, 233, 234, 235, 236, 240, 245, 247, 248, 249, 250, 282 या गटाकरिता 3900 चौरस मीटर रेडी रेकनरचा दर होता परंतु या दर पत्रकात 390 चौरस मीटर मूल्यांकन केले जात आहे.

तसेच नव्याने निवासी विभागात समाविष्ट झालेल्या सर्व्हे क्रमांक जमिन गट क्रमांक 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 231 याकरिता प्रति चौरस 3200 रुपये रेडी रेकनर दराऐवजी 320 चौरस मीटर मूल्यांकन दर सूचीमध्ये दाखवण्यात आले आहे त्यामुळे येथील करोडो रुपये जमिनींचे मूल्यांकन लाखात झाले आहे.

दरम्यान जितेंद्र जाधव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाला लेखी पत्र दिले असून याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, तसेच वर्षभरात या जमिनीचे झालेले दस्त चुकवण्यात आलेला शासनाचा महसूल याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जमिनीचे मूल्यांकन कमी व्हावे...

शहरातील बरेचश्या जमिनीचे गट हे मुख्य रस्त्याला सन्मुख असतात. असे गट हे छोट्या रस्त्यालगत सुद्धा असतात. या जमिनीचे गटाचे मूल्यांकन मुख्य रस्त्यालगत असल्याने, मूल्यांकन ज्यादा आकारले जाते. त्यामुळे सरकारला काही ठिकाणी नागरिकांना बांधकाम परवानगी घेताना जादा विकासदर भरावा लागतो. अशा गटांची दुरुस्ती होऊन वाढवलेल्या जमिनीचे मूल्यांकन कमी झाले पाहिजेत- दीपक काटे, माजी अध्यक्ष क्रेडाई, बांधकाम व्यावसायिक, बारामती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com