बारामती - इयत्ता दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 97.60 टक्के असा निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांहून अधिक आहे. यंदाच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे 81 पैकी तब्बल 40 शाळा शंभर नंबरी (शंभर टक्के निकाल) ठरल्या आहेत.