बारामतीत पोलिसांची विशेष वाहतूक कारवाई

बारामतीत पोलिसांची 
विशेष वाहतूक कारवाई
Published on

बारामती, ता. १५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती पोलिसांनी विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबविली.
बारामती पोलिस उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकारी व ५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान भिगवण रस्ता, एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक तसेच गदिमा रस्ता येथे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. ट्रिपल सीट प्रवास, दुचाकींमध्ये करण्यात आलेले बेकायदा मॉडिफिकेशन, नियमबाह्य सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये नागरिकांसह विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली. गणेशोत्सव काळात शहरातील गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई आगामी काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. पोलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच धावपळ उडाली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com