Baramati News : बारामतीत बँक ऑफ बडौदाच्या प्रबंधकाने बँकेतच संपवले जीवन
Maharashtra Update : कामाच्या ताणाला कंटाळून बारामतीतील बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा यांनी आत्महत्या केली असून, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी डोळे दान आणि पत्नीची माफी मागितली आहे.
बारामती : शहरातील भिगवण रस्त्यावरी बँक ऑफ बडौदाचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा (वय 45, मूळ.रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. बारामती) यांनी गुरुवारी (ता. 17) मध्यरात्री बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.