बारामती : नियंत्रण सुटल्यानं दुचाकी कालव्यात कोसळली; आजोबा-नातीचा अंत

पाटस रस्त्यावरील नीरा डाव्या कालव्याजवळ घडली घटना
Uttam Pachangane_Samrudhi Chavan
Uttam Pachangane_Samrudhi ChavanSakal Media

बारामती : पाटस रस्त्यावर नीरा डावा कालव्यानजिकच्या रस्त्यावरुन जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती चालक आजोबा आणि नातीसह कालव्यात कोसळली. या अपघातात दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Baramati Two wheeler falls into canal grandpa and granddaughter died)

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कुरकुंभ येथून आपली नात (मुलीची मुलगी) समृध्दी विजय चव्हाण (वय १२, रा. कुरकुंभ, ता. दौंड) हिला दुचाकीवरुन घेऊन आजोबा उत्तम नामदेव पाचांगणे (वय 52, रा. सातववस्ती, बारामती) हे बारामतीकडे निघाले होते. सकाळी दहाच्या सुमारास पाटस रस्त्यावरुन त्यांनी आपली दुचाकी नीरा डावा कालव्याशेजारील भरावावरुन सातव वस्तीकडे घेतली. काही अंतरावर तीन मोऱ्या आहेत, एका बाजूला नीरा डावा कालवा, दुसऱ्या बाजूला कऱ्हा नदी असा हा इंग्रजांच्या काळात नदीवर कालव्यासाठी बांधलेला पूल आहे. या पूलाच्या भरावाच्या शेवटच्या टोकापर्यंत उत्तम पाचांगणे यांनी दुचाकी व्यवस्थित नेली. मात्र, शेवटच्या टोकाजवळ दुचाकी गेल्यावर त्यांनी दुचाकीवरील नियंत्रण गमावलं. पाय खाली टेकवण्याच्या प्रयत्नही त्यांनी केला पण त्यांची दुचाकी दोघांसह थेट नीरा डावा कालव्यात कोसळली.

Uttam Pachangane_Samrudhi Chavan
लॉकडाउनबाबतचा भारताचा 'ग्लोबल स्ट्रिंजन्सी इंडेक्स' पोहोचला ७४वर; जाणून घ्या...

ज्या ठिकाणी ही दुचाकी कोसळली तिथे पाण्याला ओढ आहे आणि प्रवाह वेगाने वाहत आहे. त्यामुळे य दोघांना बचावाची संधीच मिळाली नाही. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने हे दोघेही वाहून जाऊ लागल्यानंतर उत्तम यांनी समृध्दीला वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.

दरम्यान, स्थानिकांनी या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. यावेळी उत्तम पाचांगणे यांच्या खिशातील वस्तू तपासल्यानंतर एक कार्ड सापडले त्यावर स्थानिक नागरिकांनी संपर्क केला आणि या घटनेची माहिती दिली. एकाच वेळेस आजोबा व नातीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पाचांगणे आणि चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सकाळचे माळेगावचे बातमीदार कल्याण पाचांगणे यांचे उत्तम हे चुलत बंधू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com