Accident : मित्रांसोबत मोबाईल घेण्यासाठी निघाला अन्... ; बारामतीत ट्रकखाली सापडून दोघांचा मृत्यू

डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. मात्र याच अपघातात दुचाकीवरीलच एक युवक अतिशय आश्चर्यकारकरीत्या या अपघातातून बचावला.
Baramati Accident
Baramati AccidentSakal

बारामती - येथील विद्या कॉर्नर चौकामध्ये डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. मात्र याच अपघातात दुचाकीवरीलच एक युवक अतिशय आश्चर्यकारकरीत्या या अपघातातून बचावला. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भर चौकात हा अपघात झाला.

या अपघातात प्रतीक विजय भोसले (वय 20) व निखिल सौताडे (वय 20) (दोघेही रा. दुधोडी, ता. कर्जत, जि.नगर) यांचा मृत्यू झाला. दुचाकी वरील संदेश कुंभार याने गाडी डंपरला धडकते आहे हे पाहिल्यावर गाडीवरून उडी मारल्यामुळे तो आश्चर्यकारकरीत्या बचावला. त्याला कसलीच दुखापत झाली नाही.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निखिल सौताडे हा भारतीय सैन्य दलात भरती झाला होता व त्याने ऑनलाईन मोबाईल मागवला होता. हा मोबाईल पार्सलने आला होता तो मोबाईल घेण्यासाठी तिन्ही मित्र मोटरसायकल वरून निघाले होते. त्याच वेळेस बारामती बाजू कडून आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या डंपरसमोरच दुचाकी आल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Baramati Accident
Wafgaon Fort : पुणे परिसर दर्शन : वाफगावचा किल्ला

मोटरसायकलवर असलेले तिघे एकमेकांचे मित्र होते. यामध्ये प्रतीक विजय भोसले हा विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. हे तिघे एकाच रूमवर वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये प्रतीक भोसले व निखिल अवताडे यांच्या अंगावरून ट्रकचे चाक केल्यामुळे त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.

दोन्ही युवकांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. निखिल सौताडे हा आपल्या आईला बारामतीत दवाखान्यात घेऊन आलेला होता व उद्या ते पुन्हा गावी परत जाणार होते. त्याचे नुकतेच लग्न ठरलेले होते, अशीही माहिती पुढे आली आहे.

या अपघातानंतर अपघातातून बचावलेल्या संदेश कुंभार याला देखील कमालीचा मानसिक धक्का बसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com