Baramati News : शारदाबाई पवार... ते सुनेत्रा पवार... प्रवास उलगडला गेला...

निवडणूकीच्या प्रचाराच्या सांगता सभेनिमित्त बोलताना सुनेत्रा पवार यांनी शारदाबाई पवार ते सुनेत्रा पवार हा प्रवास खास शैलीत उलगडला.
Sunetra Pawar

Sunetra Pawar

sakal

Updated on

बारामती - निवडणूकीच्या प्रचाराच्या सांगता सभेनिमित्त बोलताना सुनेत्रा पवार यांनी शारदाबाई पवार ते सुनेत्रा पवार हा प्रवास खास शैलीत उलगडला.

भाषणाच्या सुरवातीलाच सुनेत्रा पवार म्हणाल्या, या मंचावर भाषण सुरु करण्यापूर्वी एका व्यक्तीच स्मरण करण माझ्यासाठी अत्यंत महत्वाच आहे, पवार कुटुंबाच्या राजकीय व सामाजिक वारशाची पायाभरणी, ज्यांनी केली त्या दादांच्या आजी शारदाबाई पवार यांच. त्यांनी एक सून म्हणून केवळ पवारांच कुटुंब सांभाळल नाही तर त्यांनी संस्कार, नीतीमूल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. या मधूनच पुढे विविध क्षेत्रांमध्ये मोठी नेतृत्व घडत गेली, त्यांनी कुटुंबापुरतच मर्यादीत न राहता समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com