बारामती तालुक्यात टंचाईची समस्या गंभीर

बारामती तालुक्यात टंचाईची समस्या गंभीर
Published on

बारामती, ता. १५ : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बारामती तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. गतवर्षी एकही टॅंकरची गरज न भासणाऱ्या बारामती तालुक्याला सध्या ९ गावे व ५४ वाड्या-वस्त्यांमध्ये ५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिका आणि सार्वजनिक पाणी योजनांवरील ताण वाढल्याने पाणी आटल्याने प्रशासनाला टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, गोजुबावी-सावंतवाडी, जराडवाडी (बनवाडी), उंडवडी क.प. (भोपळबेट) तसेच जळगाव सुपे येथूनही टॅंकरची मागणी प्राप्त झाली असून संबंधित प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाच टँकर : दररोज २२ खेपा
१३ हजार ९४ .....नागरिकांना पाणीपुरवठा

टँकर सुरू असलेली गावे
अंजनगाव, थोपटेवाडी, गाडीखेल, देऊळगाव रसाळ, सोनवडी सुपे, कारखेल, सावळ, जैनकवाडी आणि मोराळवाडी

महिलांची पाण्यासाठी अतिरिक्त पायपीट
सार्वजनिक पाणी योजनांमधून अनेक गावांना नियमित पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी काही भागांमध्ये जलस्रोत आटू लागल्याने टॅंकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महिलांना पाण्यासाठी अतिरिक्त पायपीट करावी लागत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दृष्टिक्षेपात
- मागील वर्षी टॅंकर सुरू करण्याची वेळ आली नव्हती.
- यंदा मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत घट
- मे महिन्याच्या मध्यातच टंचाईचे तीव्र संकट

तालुक्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून आवश्यकतेनुसार आणखी टॅंकर सुरू करण्यात येतील. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे.
- किशोर माने, गटविकास अधिकारी, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com