बारामतीतील शेतकऱ्यांची मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धाव; तातडीने पाणी सोडण्याची मागणी

बारामतीतील शेतकऱ्यांची मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धाव; तातडीने पाणी सोडण्याची मागणी
Published on

पाणीटंचाईने बारामतीतील
अडीच हजार एकर क्षेत्र संकटात

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
माळेगाव : निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानक बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. परिणामी ऊसासह चारा पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहे.
या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, गुणवडी, मळद आणि खांडज येथील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
शेतकरी प्रतिनिधींनी निरा डावा कालवा बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या संकटाची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना दिली. कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने अनेक गावांतील शेती कोरडी पडत असून ऊस, हिरवा चारा आणि इतर पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
शिष्टमंडळाने केवळ पाणीटंचाईच नव्हे, तर परिसरातील विविध कृषी व सिंचनविषयक अडचणीही उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. या सर्व मागण्या व सूचनांची सविस्तर माहिती घेत पवार यांनी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ‘‘बारामतीतील शेतकरी बांधवांच्या हिताशी संबंधित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल. संबंधित जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.
या भेटीदरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, स्वप्नील जगताप, प्रकाश सोरटे, जयपाल देवकाते, अविनाश देवकाते, सुरेश देवकाते, विठ्ठल देवकाते, राजेश देवकाते आदी शेतकऱ्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यांनी पाणीअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची वस्तुस्थिती सांगत कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

उसाच्या क्षेत्रावर संकटाचे सावट
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसत असून, आगामी गळीत हंगामासाठी ऊस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याचा परिणाम पुढील हंगामातील गाळप क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी नितीन सातव आदी शेतकऱ्यांनी केली.

‘पाणी मिळाले नाही तर पिकांचे मोठे नुकसान’
निरा डावा कालवा बंद राहिल्यास ऊस, चारा आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून, तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे, असे अविनाश देवकाते यांनी सांगितले.


-----------------
खालील बातमी वाचू नये
माळेगाव ः   निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानकपणे बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. परिणामी ऊसासह चारा पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, गुणवडी, मळद आणि खांडज येथील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
शेतकरी प्रतिनिधींनी निरा डावा कालवा बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या संकटाची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांना दिली. कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने अनेक गावांतील शेती कोरडी पडत असून ऊस, हिरवा चारा आणि इतर पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळाने केवळ पाणीटंचाईच नव्हे, तर परिसरातील विविध कृषी आणि सिंचनविषयक अडचणीही उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. या सर्व मागण्यांची आणि सूचनांची सविस्तर माहिती घेत पवार यांनी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, “बारामतीतील शेतकरी बांधवांच्या हिताशी संबंधित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल. संबंधित जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.” शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव,  स्वप्नील जगताप, प्रकाश सोरटे, जयपाल देवकाते, अविनाश देवकाते, सुरेश देवकाते, विठ्ठल देवकाते, राजेश देवकाते आदी शेतकऱ्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यांनी पाणीअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची वस्तुस्थिती मांडत तातडीने कालव्याचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली.

उसाच्या क्षेत्रावर संकटाचे सावट
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसत असून, आगामी गळीत हंगामासाठी ऊस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याचा परिणाम पुढील हंगामातील गाळप क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी नितीन सातव आदी  शेतकऱ्यांनी केली.
.....

चौकट : ‘पाणी मिळाले नाही तर पिकांचे मोठे नुकसान’
निरा डावा कालवा बंद राहिल्यास ऊस, चारा आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून, तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे, असे अविनाश देवकाते यांनी सांगितले.
...

मुंबई : येथे बारामती तालुक्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत शेतकरी प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com