पत्नीवर हातोड्याने हल्ला करणाऱ्या पतीला सात वर्षे सक्तमजुरी

पत्नीवर हातोड्याने हल्ला करणाऱ्या 
पतीला सात वर्षे सक्तमजुरी
Published on

बारामती, ता. ५ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात हातोड्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या विलास दादा नेटके (रा. सहजपूर, ता. दौंड) याला बारामतीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ललिता नेटके यांच्यावर १५ जुलै २०२० रोजी आरोपी विलासने लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी एन. एस. लक्के यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये जखमी ललिता, त्यांचा मुलगा सुमेश आणि डॉ. शलाका लोणकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर वाघाज, वेणुनाथ ढोरे, गोरख कसपटे व ए. जे. कवडे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com