esakal | बारामती होणार वैद्यकीय हब - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar

‘बारामती हे शैक्षणिक हब झाले तसे आता वैद्यकीय हब होऊ पाहत आहे. अर्थात, बारामती मेडिकल कॉलेज ही त्याची पायरी आहे. महाराष्ट्रात कोठे जर मेडिकल कॉलेजचे मॉडेल पाहायचे असेल, तर बारामतीचे नाव पुढे येईल,’’ असा विश्‍वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.

बारामती होणार वैद्यकीय हब - शरद पवार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माळेगाव - ‘बारामती हे शैक्षणिक हब झाले तसे आता वैद्यकीय हब होऊ पाहत आहे. अर्थात, बारामती मेडिकल कॉलेज ही त्याची पायरी आहे. महाराष्ट्रात कोठे जर मेडिकल कॉलेजचे मॉडेल पाहायचे असेल, तर बारामतीचे नाव पुढे येईल,’’ असा विश्‍वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे बुधवारी झालेल्या एका हॉस्पिटलच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे होते. 
पवार म्हणाले, ‘‘एक काळ असा होता, की बारामती शहरानंतर महत्त्वाचे गाव म्हणजे ‘माळेगाव’. ५२ वर्षांपूर्वी माझ्या राजकारणाची सुरुवात झाली ती या माळेगावातून.

गावानेच मला राजकारण, समाजकारणात उभे केले. भीमदेवराव गोफणे, माधवराव तावरे, भालबाकाका तावरे, मुरलीधर तावरे या माळेगावकरांसह पणदरे-हनुमानवाडीतील धुळाबापू कोकरे, विठ्ठलराव कोकरे, जगन्नाथराव काकरे यांसारख्या तालुक्‍यातील अनेक मंडळींनी प्रामाणिकपणे सुरुवातीपासून मला साथ दिली.’’

loading image