Baramati Crime : बारामतीत युवकाचा कोयत्याने वार करून खून
Police Investigation : बारामतीत १९ वर्षीय युवक अनिकेत गजाकस नात्यातील मुलीकडे पाहतो आणि तिच्याशी बोलतो या कारणावरून कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बारामती : आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो व तिच्याशी सतत बोलतो या कारणावरून एका 19 वर्षीय युवकाचा गुरुवारी (ता. 19) रात्री कोयत्याने वार करून खून करण्यात आला.