

Baramati Zilla Parishad election
sakal
बारामती : अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी बुधवारी (ता. 21) आपले पत्ते खुले केले. बारामतीतील राजकीय गणितेच बदलल्याची चिन्हे या निवडणूकीत समोर येणार आहेत. राष्ट्रवादीने पंचायत समितीच्या दोन जागा भाजपसाठी सोडून दिल्याची चर्चा होती.
मिळालेल्या माहितीनुसार शिर्सुफळ गणात भाजप नेते बाळासाहेब गावडे यांचे चिरंजिव अनिकेत गावडे यांनी कमळाच्या चिन्हावर तर सुपे गणात उज्वला पोपट खैरे यांनीही कमळाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही गणात राष्ट्रवादीने कोणत्याही उमेदवाराला अधिकृत एबी फॉर्मच दिला नसल्याने या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने भाजपला बाय दिला आहे का अशी चर्चा बारामतीत सुरु झाली. दरम्यान छाननीनंतर राष्ट्रवादी या दोन गणात दोन उमेदवारांना पुरस्कृत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.