
बारामती : येथील युवा उद्योजक मानस चेतन शहा (वाल्हेकर) याने तयार केलेल्या अंगठीच्या डिझाईनला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. स्विर्त्झंलंड येथे नुकत्याच झालेल्या जेमजिनिव्ही या आंतरराष्ट्रीय दागिने घडणविषयक प्रदर्शनात मानस शहा याने सहभाग नोंदविला होता. गेल्या काही वर्षांपासून तो या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या इटली येथे तो प्रशिक्षणासाठी गेलेला आहे.