पुणे - धायरी व परिसरातील भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण आढळत असल्याने पाणी पुरवठा विभाग खडबडून जागा झाला. या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारांगणे मळा विहिरीतील पाण्यात क्लोरिन टाकण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे पाण्यातील घातक जिवाणूंचा नायनाट होत असल्याने जीबीएसचा धोका कमी झाला आहे. मात्र, अद्याप नांदेड येथील विहिरीवर ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.