माझा प्रभाग माझे व्हिजन

माझा प्रभाग माझे व्हिजन

Published on

BAR26B13056
प्रभागात सार्वजनिक स्वच्छतेवर भर देणार

बार्शी : बार्शी शहरातील सर्वांत मोठा प्रभाग म्हणून १७ नंबर प्रभागाकडे पाहिले जाते. या प्रभागात अनेक प्रकारची सर्व कामे झाली असली तरी आणि रस्त्यांची कामे बाकी आहेत. उर्वरित गटारी आणि रस्त्यांची कामे प्राधान्याने करून घेणार आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रभागांबरोबरच शहरातील इतर प्रभागात देखील मला काम करण्याची संधी आहे त्यामुळे इतर ठिकाणच्या प्रभागात गटाराची स्वच्छता, पाणीपुरवठा किंवा रस्त्यांची समस्या असेल तीही कामे देखील मी लोकांचा सेवक म्हणून करणार आहे. माझी वसुंधरा योजनेमधून नगरपरिषदेच्या खुल्या जागेमध्ये छोटे उद्यान किंवा एखादे छोटे सभागृह प्रभागातील नागरिकांसाठी करण्याचा मानस आहे. लहान मुले आणि महिलांसाठी करमणुकीचे साधन म्हणून एखादे छोटे उद्यान देखील उभारण्याचा संकल्प असून तेही लवकरात लवकर पूर्ण करू अशी खात्री आहे.
प्रकाश माने, नगरसेवक, नगरपरिषद, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com