माझा प्रभाग माझे विजन

माझा प्रभाग माझे विजन
Published on

माझे व्हीजन
बार्शी नगरपरिषद

- BAR26B13042
प्रभागातील मुलांना डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न
माझा प्रभाग हा बार्शी शहराचा जुना भाग आहे. माझ्या प्रभागात अनेक प्रकारची कामे करण्याची संधी आहे. विशेषतः सार्वजनिक स्वच्छता आणि स्वच्छ पाणीपुरवठा हे माझे ध्येय आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांसाठी चांगल्या पद्धतीचे शिक्षण आणि आत्ताच्या आधुनिक युगाला अनुसरून डिजिटल शिक्षण कसे देता येईल, याकडे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे. या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणे मला आवडणार आहे. संगणक शिक्षणाच्या माध्यमातून ही लहान मुले साक्षर करण्याचे ध्येय आहे. याबरोबरच शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या संरक्षणासाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी अधून मधून शिबिरे घेण्याचा देखील मानस आहे. देशाची भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबरच त्यांना डिजिटल आणि संगणकीय शिक्षण देणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे या कामाकडे मी जास्त लक्ष देणार आहे.
- भारत पवार, नगरसेवक, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com