

सव्वावर्ष हुलकावणी देणाऱ्या फरार महिला आरोपीस अटक
बार्शी तालुका पोलिसांची कारवाई; शेतकरी, कामगाराचा वेश धारण करून दीड दिवस पाळत
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. २ : सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी गेल्या १५ महिन्यांपासून फरार असलेल्या महिला आरोपीस बार्शी तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून अटक केली. राणी अरुण साळवे (वय २६, रा. बहुसिंगपुरा, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मोबाईल क्रमांक व राहण्याची ठिकाणे वारंवार बदलून पोलिसांना गुंगारा देत होती. नृत्यकलेचे कार्यक्रम करून ती विविध भागांत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी बहुसिंगपुरा येथील डोंगराळ परिसरात असल्याचे समोर आले. मात्र, डोंगराळ भागामुळे मोबाईल लोकेशनवरून तिचा अचूक ठावठिकाणा शोधणे आव्हानात्मक होते.
पोलिसांनी शेतकरी व कामगाराचा वेश धारण करून दीड दिवस परिसरात वावरत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. योग्य संधी साधून तिला ताब्यात घेण्यात आले. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाईत महिला पोलिस उपनिरीक्षक सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, युवराज गायकवाड, ओमप्रकाश दासरे व सिद्धेश्वर लोंढे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.