बार्शीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
जन्मदात्या आईसमोरच चिमुकलीचा विनयभंग
वडिलांच्या मदतीने पोलिसांत धाव; आईसह मेहबूब बागवानविरुद्ध बार्शीत गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ४ : इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका साडेअकरा वर्षीय चिमुकलीच्या विनयभंग प्रकरणी मेहबूब बागवान (रा. बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपीचे कृत्य चिमुकलीने आईला सांगूनही तिने पोटच्या मुलीलाच गप्प केले. तिच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगी बार्शीतील एका खासगी अनुदानित शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात आहे. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास मेहबूब अल्पवयीन मुलीच्या घरी आला. घरात कोणी नसल्याचे पाहूनच तो आला होता. घरातील सगळे कोठे गेलेत विचारून तो घरात येऊन बसला. त्याने अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून तिचा विनयभंग केला. त्याच्या अश्लील कृत्याला घाबरून चिमुकली घराबाहेर पळून गेली. आई घरी आल्यावर तिला हकिगत सांगितली, पण तीने ‘तो मामा आहे, काही होत नाही’ असे सांगून गप्प केले. दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारीला मेहबूब पुन्हा घरी आला आणि त्याने आईसमोरच चिमुकलीचा गाल पकडून ‘आईनंतर आता तुझाच नंबर आहे’ असे म्हणून गेला. त्याच रात्री चिमुकलीने आईला मेहबूबसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यावेळी मेहबूबने मुलीचे तोंड दाबून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या आईने देखील ‘जर ही बाब वडिलांना सांगितली, तर आम्ही दोघे तुला जिवे मारू’ अशी भीती घातली आणि दोघेही निघून गेले. २४ फेब्रुवारीला पीडितेच्या वडिलांनी त्यांची पत्नी हरवल्याची तक्रार बार्शी शहर पोलिसांत दिली. त्यानंतर मेहबूबने पीडितेच्या वडिलांना फोन करून पीडितेची आत्या व आईबद्दल अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी पीडितेने वडिलांना आपबिती सांगितली आणि वडिलांनी पोलिस ठाणे गाठले. त्यावरुन पीडितेची आई व मेहबूब बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

