

BAR26B14050
बार्शी : चोरीला गेलेले मोबाईल तक्रारदारांना परत करताना एपीआय अक्षय सोनवणे.
---
बार्शी पोलिसांनी परराज्यांतून
शोधून आणले ४५ मोबाईल
१२.५७ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. ५ : बार्शी तालुका पोलिसांनी चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले १२ लाख ५७ हजार रुपये किमतीचे ४५ मोबाईल हस्तगत केले. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह विविध ठिकाणांहून हे मोबाईल शोधून काढण्यात आले. खातरजमा केल्यानंतर गुरुवारी (ता. ५) वसुबारसेच्या मुहूर्तावर संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चोरीस गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या ५९ गावांच्या हद्दीत हरवलेल्या, गहाळ झालेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे राज्यातील विविध शहरांसह परराज्यांत शोधमोहीम राबवली. त्यातून ४५ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
गुरुवारी पोलिस उपअधीक्षक सुहास जगताप आणि सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले. या कारवाईत पोलिस कर्मचारी सिद्धेश्वर लोंढे, ओमप्रकाश दासरे, सागर वाकळे आणि राहुल सोनकर यांनी सहभाग घेतला. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.