मोठा आवाज करणाऱ्या बुलेट वाहनांवर कारवाई
PNE26V97752
बार्शी : शहरातून मोठ्या आवाजात फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना पोलिस कर्मचारी.
.....
बार्शी पोलिसांची ‘सायलेन्सर’वर धडक कारवाई
.....
शाळा, महाविद्यालय परिसरात आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांना दंड
..........
बार्शी शहर, ता. २१ : शहरात मोठ्या आवाजात ‘फटाका सायलेन्सर’ लावून फिरणाऱ्या बुलेटसह इतर दुचाकी वाहनांवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. शाळा, महाविद्यालये, दवाखाने आणि भरवस्तीत ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनांचे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले असून संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिली.
शहरात सर्वत्र अनेक टवाळखोर तरुण शाळा कॉलेज भरताना व सुटताना त्या परिसरात कर्णकर्कश असा फटाका सायलेन्सरचा आवाज काढतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते, तसेच रस्त्यावरून जातानादेखील ते बेफान वेगाने वाहन चालवतात मोठ्याने वाहन चालवल्यामुळे मोठा आवाज ऐकू येतो याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळेच वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी शहराच्या विविध भागात फिरणाऱ्या अशा रोड रोमिओन वर कारवाई करत बुलेटसह इतर गाड्यांचे मोठे सायलेन्सर मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरदेखील काढूनच टाकले आहेत. तसेच पुन्हा मोठ्या आवाजाचे वाहन चालविल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याची तंबीही महेश गळगटे यांनी दिली. शहरात मोठ्या आवाजात वाहने चालवल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वृद्ध नागरिक आणि महिला मुलींना याचा खूप त्रास होत आहे. ही बाब ध्यानात घेऊनच शहर पोलिस शहर पोलिस ठाण्याच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी कुकडे यांनी सांगितले.
गुन्हे दाखलचा इशारा
याबाबत वाहनांचे सायलेन्सर काढून पुन्हा वाहन चालविल्यास त्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारादेखील यावेळी पोलिसांनी दिला.
कोट
शहरातील नागरिकांनी विशेषतः महिला आणि महाविद्यालयीन तरुणींनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कॉलेज परिसरात असे वाहनचालक असतील आणि मोठ्या आवाजात वाहन चालवून व्यत्यय आणत असतील तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क करावा. पोलिस त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करतील.
- महेश गळगटे, पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग, बार्शी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

