मुलींनी अनुभवले पोलीस ठाण्याचे कामकाज

मुलींनी अनुभवले पोलीस ठाण्याचे कामकाज

Published on

BAR26B12834
फोटो ओळ : बार्शी : शहर पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस दल विषयी मार्गदर्शन करताना बालाजी कुकडे.

साधना प्रशालेतील मुलींनी अनुभवले पोलिसांचे काम
बार्शीत पोलिस स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ३ : महाराष्ट्र पोलिस दलाच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २) शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज माहीत व्हावे, म्हणून साधना कन्या प्रशालेतील मुलींनी पोलिसांच्या कामकाजाचा अनुभव घेतला.
पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी यानिमित्त वाहतुकीचे नियमाबाबत सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी हेल्मेट, बंदूक, अश्रुधूर नळकांडी, रायफल, पिस्टलसह अत्याधुनिक उपकरणा विषयी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप यांनी मुलींना मार्गदर्शन केले. तसेच पोलिस ठाण्यातील विविध विभागाचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली. जनतेसाठी नेमकी पोलिसांची काय कामे आहेत, तसेच पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार, तुरुंग, गुप्त वार्ता, वायरलेस विभाग या विभागांची माहिती जगताप यांनी साधना कन्या प्रशालेतील मुलींना दिली. यावेळी शिक्षक, शिक्षिकांसह पोलिस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com