माझा प्रभाग माझे व्हिजन
स्वच्छ आणि सुंदर प्रभागासाठी प्रयत्नशील राहणार
बार्शी : माझ्या प्रभागात जास्तीत जास्त सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा आणि दळणवळणासाठी चांगले रस्ते करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. शहरात काँक्रिटच्या गटारी करून त्या सतत स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा कसा होईल याकडे लक्ष देत ज्या भागात पाण्याचा स्रोत कमी आहे, अशा ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या बसवून तेथील नागरिकांची पाण्याची सोय केली जाणार आहे. प्रभागातील महिलांसाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रसाधनगृह उभारून त्याची देखभाल देखील व्यवस्थितरित्या नगरपालिकेमार्फत केली जाणार आहे. नगरपरिषदेच्या खुल्या जागेत प्रभागातील लहान मुले आणि वृद्धांसाठी एखादे उद्यान उभारून विरंगुळा केंद्र तयार करण्यावर माझा प्रयत्न आहे. प्रभागातील गरीब नागरिकांसाठी शासकीय योजनेतून घरकुले देण्यासाठीही मी प्रयत्नशील आहे.
महेदीमियाँ लांडगे, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

