

PGN26B01387
पानगाव (ता. बार्शी) : येथे दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानाप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
संत तुकाराम विद्यालयात गुणवंतांचा सन्मान
पानगाव : पानगाव (ता. बार्शी) येथील संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आनंद कसबे यांनी केले. दहावीत अंकिता काळे प्रथम, श्रावणी काळे द्वितीय, माधुरी मोरे तृतीय तर बारावीत दीक्षा ताटे प्रथम, साक्षी काळे व अमृता जाधव द्वितीय तर आरती वलगुडे तृतीय आली. जयकुमार शितोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी प्रकाश कानगुडे, आबासाहेब ताटे, नितीन काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राजक्ता यादव यांनी केले.
-----
शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश
बार्शी शहर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १८२ पैकी ७९ विद्यार्थी, तर आठवीत २५४ पैकी ९६ विद्यार्थी पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना एस. डब्ल्यू. करंजकर, एस. एस. पाटील, पी. एस. जाधव, ए. आर. जाधव, जे. एम. तोगे, व्ही. डी. चव्हाण, एस. एस. शेळके आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने यांनी विद्यार्थ्यांचे काैतुक केले.
-----
MAO26B03989
मळेगाव (ता. बार्शी) : येथे भक्त सुरेश यावलकर यांचा सत्कार करताना यात्रा कमिटीचे सदस्य.
---
मळेगावात भोलेनाथ महाराजांची यात्रा उत्साहात
मळेगाव : बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे भोलेनाथ महाराजांची जयंती व यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन, प्रवचन, पालखी मिरवणूक, कुस्ती, अन्नदान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा पार पडली. बकसेट्टी यांनी सभा मंडपासाठी दिलेल्या ५० हजार रुपयांच्या हजार वीट दानाबद्दल, तसेच सुरेश यावलकर यांनी दिलेल्या १ लाख ४६ हजार १०१ रुपयांच्या देणगीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
CKL26B03029
चिखलठाण (ता. करमाळा) : येथील रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयातील दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
---
चिखलठाण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चिखलठाण : चिखलठाण (ता. करमाळा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयातील दहावीतील २० गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक दिलीप वायदंडे, संदीपान बारकुंड, माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, विकास गलांडे उपस्थित होते. मच्छिंद्र सरडे, मुख्याध्यापक वायदंडे व राजेंद्रकुमार बारकुंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीपाल गव्हाणे यांनी केले तर आभार सुशांत नलवडे यांनी मानले.
-----
MDH26B05354
मानेगाव (ता. माढा ): धानोरे-वाळूज रस्ता खडीकरण, मुरुमीकरणाचा प्रारंभ करताना उपस्थित मान्यवर.
---
धानोरे-वाळूज रस्ता खडीकरणास प्रारंभ
मानेगाव : धानोरे ते वाळूज रस्त्याच्या खडीकरण व मुरुमीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला. भाजप तालुका उपाध्यक्ष अमोल देशमुख यांच्या प्रयत्नातून व तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या सहकार्याने हे काम सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. उद्घाटनाप्रसंगी पंडित देशमुख, औदुंबर देशमुख, मंगेश देशमुख, बिरुदेव शेळके, महेश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.