

फोटो व्हायरल करण्याची
धमकी देत तरुणीचे शोषण
बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. १३ : अश्लील फोटो व रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. तसेच पैशांची मागणी करून सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप असलेल्या तरुणाविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ई) व ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२५मध्ये आरोपीने तरुणीला लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. ८ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीने फोन करून पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणी आरोपीच्या घरी गेली. तेथे फोटो व रेकॉर्डिंग डिलीट करण्यासाठी आरोपीने पैशांची मागणी केली, तसेच तिच्यावर जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर आरोपीने तरुणीच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. तसेच तरुणीच्या लग्नासाठी निश्चित झालेल्या तरुणाला तिचे फोटो व संदेश पाठवून ते व्हायरल केल्याने लग्न मोडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.