Barti Student Agitation
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (बार्टी) पीएच.डी. अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) संदर्भातील प्रलंबित मागण्यांसाठी संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या २१ दिवसांपासून बार्टीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. तर काही विद्यार्थ्यांनी गेल्या ११ दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. परिणामी या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र अर्जप्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल पुन्हा सुरू करणे, वयोमर्यादेची अट रद्द करणे आणि सरसकट फेलोशिप लागू करणे यांसारख्या प्रमुख मागण्यांवर विद्यार्थी ठाम आहेत. जोपर्यंत राज्य सरकारकडून ठोस लेखी आदेश (जीआर) निघत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.