Pune News : ‘बार्टी’च्या कौशल्य प्रशिक्षणातून १४ हजार तरुणांना संधी; सुमारे ९ हजार तरूणांना रोजगार व स्वयंरोजगाराची वाट

बदलत्या रोजगार बाजारपेठेत केवळ पदवी नव्हे, तर उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत.
Barti

Barti

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - बदलत्या रोजगार बाजारपेठेत केवळ पदवी नव्हे, तर उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत. ही गरज ओळखून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ने (बार्टी) अनुसूचित जातीच्या तरुणांच्या हाताला कौशल्याचे आणि रोजगाराचे मोठे बळ दिले आहे. गेल्या चार वर्षांतील कौशल्य विकास कार्यक्रमातून गेल्या चार वर्षांत १४ हजार १८९ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी तब्बल ९ हजार तरुणांना रोजगार किंवा स्वतःच्या व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com