Competitive Exam Coaching: बार्टी-टीआरटीआय-सारथी आदी संस्थांच्या सामायिक चाळणी परीक्षेला वयोमर्यादा शिथिल; अर्ज भरण्याची मुदत ४ सप्टेंबर २०२६पर्यंत वाढ

टीआरटीआय, बार्टी, सारथी आदी संस्थांच्या सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ साठी अर्जाची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत वाढवली; कमाल वयोमर्यादेत शिथिलतेमुळे ३० वर्षांवरील इच्छुकांनाही मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी
Age limit relaxed for Common CET; apply by September 4.

Age limit relaxed for Common CET; apply by September 4.

Sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्रातील विविध सामाजिक घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांच्या सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ साठी अर्ज करण्याची मुदत आता ४ सप्टेंबर २०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी लागू असलेली कमाल ३० वर्षांच वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणाच्या संधीपासून वंचित राहणाऱ्या अनेक पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com