

Demand for Immediate Removal and Reconstruction of Speed Breakers
Sakal
कर्वेनगर : बावधन परिसरातील बकाजी कार्नर ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायत काळात रबरचे गतिरोधक बसविले होते. ते गतिरोधक निघून गेले असून त्यासाठी वापरलेले खिळे आता रस्त्याच्या वर आले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने वाहनचालकांना धोका वाढला आहे.