

BBA, BMS, BBM and Integrated MBA 2026-27: First CAP Round offers admission opportunities to 12,282 students
Sakal
पुणे : राज्यात व्यवस्थापनशास्त्राच्या बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम) या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच एमबीए (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत १४ हजार ४०७ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर, यादीमध्ये आठ हजार ४८५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.