लॉकडाउन उठला...दारुडा पती भडकला...पाहा काय केले त्याने...!

drink.jpg
drink.jpg
Updated on

पुणे : लॉकडाउन सुरू असतानाही दारू दुकानांना परवानगी मिळाल्याने काय परिणाम होत आहेत, हे गेले दोन दिवस महाराष्ट्रभर दिसतेच आहे. आता दारुसाठी मारहाणीचे प्रकारही पहिल्यासारखेच सुरू झाले आहेत. पुण्यामध्ये तर दारुसाठी पत्नीवर फरशी फेकून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे, संबंधित जखमी महिला शिक्षिका आहे. 

पुण्यातील कर्वेनगर परिसरात हा प्रकार घडला. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने दारुसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून दारुड्या पतीने थेट फरशीच फेकून मारली आहे. 

फिर्यादी पत्नीचे वय तीस वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती काहीही कामधंदा करत नाही. घरी बसून असतो. मंगळवारी संध्याकाळी दारु पिण्यासाठी त्याने पत्नीकडे पैशाची मागणी केली. शिक्षिका असलेल्या पतीने पैसे देण्यास नकार दिला. 

या दाम्पत्याच्या घरात बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी फरशा आणून ठेवलेल्या आहेत. दारूसाठी पैसे न मिळाल्याने रागावलेल्या पतीने त्यातलीच एक फरशी उचलून पत्नीला फेकून मारली. फरशी डोक्याला लागल्याने शिक्षिका असलेली पत्नी जखमी झाली. त्यांच्या हाताला इजा झाली आहे. 

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विलास जाधव करत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. लॉकडाउनमुळे दारू दुकाने बंद होती. परिणामी, दारुड्यांमुळे घडणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारातही घट झाली होती. आता दारु दुकाने पुन्हा उघडल्याने मारहाणीसारखे प्रकार पुन्हा घडू लागले आहेत. 

महाराष्ट्रात दारु दुकाने सुरू करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवरही विविध मतप्रवाह व्यक्त होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी दारु दुकाने सुरू करण्याबद्दल आक्षेप नोंदविला आहे. मात्र, महसुलाच्या कारणासाठी राज्य सरकारने दारु दुकानांना परवानगी दिली आहे.

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com