उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज : हर्षवर्धन पाटील

उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज : हर्षवर्धन पाटील
उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज : हर्षवर्धन पाटीलहर्षवर्धन पाटील

इंदापूर : कोरोना महामारी पार्श्वभूमीवर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या असून कामगार मूळगावी परत गेल्याने काही कंपन्या बंद पडण्याच्या मार्गा वर आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवापिढीसाठी रोजगार निर्मितीचा स्तुत्य उपक्रम संयोजकांनी राबविला असून युवा पिढीने उद्योजक बनून इतरांना रोजगार निर्माण करून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज : हर्षवर्धन पाटील
"हा काश्मीरींना बदनाम करण्याचा डाव"; फारूक अब्दूल्लांनी व्यक्त केली नाराजी

मराठी मुव्हमेंट टीव्ही न्यूज व ए.आर फाऊंडेशन यांच्या वतीने युवापिढीस रोजगार निर्मितीसाठी येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थितहोते.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, बेरोजगारांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला याचा आनंद वाटतो. या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाच्या आर्थिक विकासास चालना मिळेल.

यावेळी ए. आर. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम गायकवाड, संचालक राजेशखान पटेल, राज्यसचिव साहेबराव ताटे, महाराष्ट्र राज्य प्रमुख सुरेश वाळेकर, युवानेते अमोल इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत सोनटक्के, दत्तकुमार डोंगरे, गणेश वाघ यांनी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com