सांगली : देशांतर्गत मागणीमुळे बेदाण्याचे दर टिकून

सांगली : देशांतर्गत मागणीमुळे बेदाण्याचे दर टिकून
Published on

देशांतर्गत मागणीमुळे
बेदाण्याचे दर टिकून

८० ते १ लाख टन विक्री

अभिजित डाके : अॅग्रोवन वृत्तसेवा
सांगली : देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला चांगली मागणी आणि उठाव असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. येत्या पंधरवड्यात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. आजअखेर अंदाजे ८० हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून, पुढील काळातही दर टिकून राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
राज्यात २०२४-२५ मध्ये १ लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. तर यंदा (२०२५-२६) सुमारे दोन लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून, त्यातील सर्वाधिक उत्पादन सांगली जिल्ह्यात झाले आहे. गत वर्षी मे महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीचा द्राक्ष पिकाला फटका बसल्याने बेदाणा उत्पादन घटेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर पश्‍चिम आशियातील युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला. त्याच वेळी देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाचे दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीऐवजी बेदाणा निर्मितीला प्राधान्य दिले. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली.
दर वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बेदाण्याचा हंगाम सुरू होतो. मात्र अतिवृष्टीमुळे यंदा हंगाम सुमारे २५ दिवस उशिराने सुरू झाला. सुरुवातीचे पंधरा-वीस दिवस द्राक्षाचे उत्पादन कमी असल्याने बेदाणा निर्मितीचा वेग मंद होता. त्यानंतर हंगामाला गती मिळाली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्याचे दर समाधानकारक राहिले. मे-जूनमध्ये दरात काहीशी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दरात सुधारणा झाली.
सध्या बाजारात दर्जानुसार बेदाण्याला चांगली मागणी आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत देशभरात सण-उत्सव सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीचे नियोजन सुरू केले आहे. दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलो २८० ते ४०० रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. एकूण दोन लाख टन उत्पादनापैकी आतापर्यंत ८० हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून, सध्या १ लाख ते १ लाख २० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

बेदाण्याचे प्रति किलो दर (रुपये)
हिरवा : २७० ते ४००
पिवळा : २८० ते ३५०
काळा : ७० ते १५०

कोट
देशांतर्गत बाजारात बेदाण्याला चांगली मागणी असल्याने दर देखील समाधानकारक आहेत. आता सण-उत्सवांचा हंगाम सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीला वेग येईल. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

----------
वाचू नका
सांगली ः देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला चांगली मागणी आणि उठाव असल्याने बेदाण्याचे गेल्या दोन महिन्यापासून दर स्थिर आहेत. येत्या पंधरावड्यात सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीची लगबग सुरु होईल. आजअखेर अंदाजे ८० ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली आहे. बेदाण्याचे दर टिकून राहतील असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

राज्यात २०२५ मध्ये १ लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. तर गतवर्षी राज्यात सुमारे दोन लाख टन इतके बेदाण्याचे उत्पादन झाले. त्यापैकी सांगली जिल्ह्यात सर्वाधिक बेदाणा तयार होतो. वास्तविक पाहता गतवर्षी मे महिन्यापासून अति पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला होता. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, द्राक्ष हंगाम सुरु झाल्यानंतर मध्यपूर्वेतील युध्दाची झळ निर्यातीवर झाली. त्यातच देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाच्या दरात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री करण्याऐवजी बेदाणा निर्मितीकडे वळाले. त्यामुळे यंदाच्या हंगामात द्राक्षाच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली.

दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात बेदाण्याचा हंगाम सुरु होतो. परंतू अतिपावसामुळे हंगाम सुमारे २५ दिवसांनी उशीरा सुरु झाला. अशा परिस्थितीत द्राक्षाचे उत्पादन कमी असल्याने पहिले पंधरा ते वीस दिवस हंगाम संथगतीनेच सुरु होता. त्यानंतर हंगामाला गती आली. हंगामाच्या प्रारंभापासूनच बेदाण्याचे दर टिकून होते. मे-जून महिन्यात बेदाण्याचे दर किंचित कमी झाले होते. मात्र, त्यानंतर दरात सुधारणा झाली.

बाजारात बेदाण्याच्या दर्जानुसार मागणी आणि उठावही होत आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात देशभरातील सण उत्सव सुरु होत आहेत. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांनी बेदाणा खरेदी करण्याचे नियोजन सुरु केले आहे. दर्जेदार बेदाण्याला २८० ते ४०० प्रति किलो असा दर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याचे दर चांगले असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बेदाण्याचे २ लाख उत्पादनापैकी ८० ते १ लाख बेदाण्याची विक्री झाली आहे. सद्यस्थितीला १ लाख ते १ लाख २० हजार टन इतका बेदाणा शिल्लक आहे.
....
बेदाणा दर प्रति किलो
हिरवा... २७० ते ४००
पिवळा...२८० ते ३५०
काळा...७० ते १५०
...
कोट
देशांतर्गत बाजारात बेदाण्याला मागणी चांगली असल्याने दरही चांगले राहिले आहेत. सण उत्सव येत असल्याने बेदाणा खरेदीची लगबग सुरू होईल. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहतील.
सुशील हडदरे
बेदाणा व्यापारी, सांगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com