जुन्नर - शिवाई देवी यात्रेच्या निमित्ताने आज ता. ३० रोजी शिवनेरीवरील शिवाई देवीस यात्रा कमिटीच्या वतीने अभिषेक सुरू असताना मंदिराबाहेर लातूर येथून आलेल्या १५ ते २० जणांवर आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केला..माशांपासून बचाव करण्यासाठी गळ्यातल्या उपरण्यांनी माशांना झटकत मूळ शिवाई देवी मंदिराच्या दिशेने सर्वजण पळत सुटले. यावेळी मूळ मंदिराजवळ दर्शनासाठी गेलेले पत्रकार धर्मेंद्र कोरे व त्यांच्या पत्नी मनिषा यांनी पळू नका, हालचाल करू नका, उपरणी झटकू नका अशा सूचना केल्या. मात्र तरीही घाबरून सर्वजण घाबरून पळत राहिले..पुढे रस्ता नसल्याने माघारी वळून पळू लागले. यावेळी तेथे बसलेल्या पत्रकार कोरे यांना माशांनी लक्ष्य केले. शिवाई देवीचे पुजारी सोपान दुराफे यांनी कोरे यांना शरीर झाकण्यासाठी चादर दिली. त्यांनी संपुर्ण चादरीने संपूर्ण शरीर झाकल्याने माशा हळूहळू तेथून दूर गेल्या. दरम्यान मंदिरा बाहेर मधमाशांच्या झुंडीच्या झुंडी गुंजारव करत फिरत होत्या. काही माशांनी मंदिरातील चार ते पाच भाविकांनाही लक्ष्य केले..देवीची पालखी घेऊन आलेले भोई संजय भोकरे यांनी कोरे यांच्या तोंडावर, मानेवर मधमाशांचा डंख झालेले जवळपास १७२ काटे कुशलतेने काढले. त्यानंतर सावधानतेने कोरे गडाखाली आले. जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण, रुपेश जगताप, सुजल बिडवई, ओम बिडवई तसेच पुरातत्व खात्याचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. कोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सरोदे यांनी सांगितले..संयमाची होती परिक्षाचेहरा, मान तसेच डोक्यावर माशांचा दंश झाला होता. मात्र या स्थितीत स्वतःला सावरत केवळ इच्छाशक्तीच्या बळावर हालचाल न करता सामोरे गेलो. डोक्यावर शेकडो माशा घोंगावत होत्या. काही नाकात, कानात देखील शिरल्या होत्या. या घटनेला सामोरे जाणे केवळ आत्मविश्वासाने शक्य झाले.- धर्मेंद्र कोरे, पत्रकार, जुन्नर.बेशिस्त वर्तन लोकांनी टाळावेगडावर आलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांच्या माशांचा प्रतिकार करण्यासाठी उपरणी झटकल्याने माशा उद्विग्न झाल्या. भविष्यात अशा घटनात पर्यटकांनी शिस्त पाळली तरच दुर्घटना टळू शकतील.- राहूल जोशी-अध्यक्ष सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.