उंडवडी - राज्य परिवहन विभागाच्या कामकाजातील निष्काळजीपणाचे आणखी एक उदाहरण बारामतीत उघड झाले आहे. बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील दाऊद सय्यद यांच्या मालकीचा टेम्पो कधीच बीड जिल्ह्यात गेला नसतानाही, बीड आरटीओने त्यांच्या वाहनावर दंड ठोठावला..मात्र ही बाब त्यांच्या वाहनाच्या नियमित पासिंगसाठी ते बारामती आरटीओ कार्यालयात गेले असता उघड झाली. सुदैवाने बारामती येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी तातडीने चलनातील टेम्पो वेगळा असल्याचा तपास करून हा दंड चुकीचा असल्याचे मान्य केले. व बीडच्या आरटीओ कार्यालयाला संपर्क करून पत्र पाठवून वाहनमालकाला दिलासा दिला आहे..सोनवडी सुपे येथील दाऊद सय्यदलाल सय्यद यांच्याकडे माल वाहतूक टाटा एसी (छोटा हत्ती) टेम्पो (क्रमांक- एम. ४२ ए. क्यू. २२८६) आहे. ते मागील आठवड्यात टेम्पो पासिंग करण्यासाठी बारामती आरटीओ कार्यालयात गेले.यावेळी संगणक प्रणालीत त्यांच्या गाडीवर बीड जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाचा दंड झाल्याचे नोंदवले गेले होते. ही बाब पाहून सय्यद थक्क झाले. त्यांच्या टेम्पोने कधीच बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केलेला नव्हता, तरीदेखील त्यांच्या वाहन क्रमांकावर थेट दंड दाखवण्यात आला होता..विशेष म्हणजे संबंधित चलनात एका आयशर टेम्पोचा फोटो जोडलेला होता; मात्र तो टेम्पो दाऊद सय्यद यांचा नव्हता. चुकीचा फोटो आणि वाहन क्रमांक एकसारखाच यामुळे बीड आरटीओच्या कामकाजातील हलगर्जीपणा स्पष्ट झाला आहे. मात्र याचा आर्थिक व मानसिक भुर्दंड सय्यद यांना सोसावा लागला आहे..या संदर्भात सय्यद यांनी बारामती आरटीओ कार्यालयात तक्रार मांडताच अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात दंडाची नोंद चुकीची असल्याचे लक्षात येताच, अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रणालीतून तो दंड हटविण्यासाठी बीडच्या आरटीओ अधिकाऱ्याला फोन केला व पत्र व्यवहार केला आहे. त्यामुळे आत्ता बीड आरटीओ कार्यालय, सय्यद यांच्या टेम्पोवरील दंड हटविण्यास तयार झाले आहेत..याबाबत टेम्पो मालक दाऊद सय्यद म्हणाले, मी 'स्वता सर्व कागदपत्रे घेवून बीड येथील आरटीओ कार्यालयात जावून आलो आहे. त्यांना माझा तक्रारी अर्ज आणि चलनावरील आयशर टेम्पोचा फोटो देखील दाखवला आहे. यामध्ये दोन वेळा चलन होवून आठ हजार रुपये दंड झाला आहे. हे संबधित अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणाले आम्ही लवकरच योग्य ती कार्यवाही करतो.मात्र आठ दिवस गेले तरी परिस्थिती जैसे थे आहे. आज बारामती आरटीओ अधिका-याची भेट तक्रार दिली आहे. त्यांनी बीड च्या आरटीओ कार्यालयाला पत्र पाठवले आहे. माझे आठ दिवस या कामात धावपळीत गेले आहेत. तसेच सात ते आठ हजार रुपये कारण नसताना खर्च होवून मानसिक त्रास होत आहे.’’.याबाबत बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम म्हणाले, 'बीड आरटीओ कडून वाहनाचा क्रमांक चुकला होता. त्यामुळे संबधित आयशर टेम्पो ऐवजी सय्यद यांच्या टाटा एसीवर दंड पडला होता. ही बाब सय्यद यांनी आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही बीड आरटीओ अधिका-यांना संपर्क करून संबधित टेम्पोवरील दंड हटविला आहे. त्यामुळे त्यांनां आत्ता टेम्पो पासिंग करायाला कोणतीच अडचण येणार नाही.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.