
पुणेकरांनी रिचवली सर्वाधिक बियर; राज्याच्या महसुलात विक्रमी वाढ
राज्याने यंदा कडक उन्हाळा पाहिलेला आहे. अनेक दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अनेकांनी थंडावा मिळवण्यासाठी थंड पेयांची मदत घेतली. त्यात बियरचा वाटा सगळ्यात मोठा ठरल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यात बियरच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली आहे. त्यामुळे महसुलात २१३ कोटींची वाढ झाली आहे. (Beer sales rapidly increased in last year)
गेल्यावर्षी १,४३४ कोटी रुपये एवढा महसूल मिळाला होता. पण यंदा त्यात २१३ कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे तळीरामांनी बियरला चांगलीच पसंती दिल्याची चर्चा आहे. पुणे जिल्ह्यातल्या बियर विक्रीमध्ये ३० लाख लिटरने वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, बियर, देशी दारू आणि वाईनच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ २०२१-२२ या वर्षात नोंदवली गेली. २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ या वर्षात बियरच्या विक्रीत साधारण १४ टक्क्यांची वाढ झाली होती. पण २०१९-२० च्या तुलनेत २२ टक्के घसरण झाली.
हेही वाचा: Heat wave : उष्णतेच्या लाटेने देश होरपळला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दारुविक्रीचं प्रमाण वाढलं होतं. महामारीच्या काळात गेल्या वर्षी पहिल्यांदाच वाढ झाली होती. कोरोना काळात २०२० मध्ये दारुची दुकानं, बियर बार बंद असल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला होता. २०२१-२२ मध्ये मात्र या उद्योगाने पुन्हा एकदा उभारी घेतली आहे.
Web Title: Beer Sales Increased Rapidly In Pune District Revenue Increased
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..