वाघोली - येथील गगन अदिरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत दिलेला नवीन बिअर शॉप परवाना तत्काळ रद्द करावा. अशी मागणी सोसायटीधारक व भाजपचे संदीप सातव यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली. सोसायटीचा विरोध असताना परवाना दिलाच कसा जातो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आज सायंकाळी पाच वाजता सोसायटी धारक आंदोलन करणार आहेत.