तळेगाव स्टेशन - जैवविविधतेत मोलाचा हातभार लावणारी, मानवाच्या जीभेवर मधाची नैसर्गिक गोडी पेरणारी मधमाशी गेल्या काही वर्षांत स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत आहे. वृक्षतोडीमुळे नष्ट झालेला तिचा नैसर्गिक अधिवास, वातावरणातील बदल, बंदिस्त फुलशेती, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि अज्ञानातून जाळले जाणारे तिचे मोहोळ आदी कारणांमुळे मधमाश्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. या सर्वाबाबत ‘जागतिक मधमाशी दिनानिमित्त घेतलेला हा आढावा...